करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्यांसाठी उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या माध्यमातून तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नामी संधीच म्हणावी लागणार आहे. डीआरडीओ स्टोअर्स अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि खासगी सचिव या पदांवर ही भरती होत आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल 102 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
drdo.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल. 56 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या (Government Job) उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज उपसंचालक, कार्मिक संचालनालय खोली क्रमांक 266, दुसरा मजला, डीआरडीओ, दिल्ली या पदावर पाठवावा लागणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com