करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी (Government Job) मोठी संधी आहे. इच्छुकांनी उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्जकरायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था येथे ‘वैद्यकीय शास्त्रज्ञ C’ (Medical Scientist) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया…
कुठे होतेय भरती –
राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. ही भरती प्रक्रिया एका पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची (MBBS) पदवी असणे आवश्यक आहे.
आवश्यक पात्रता – (Government Job)
एमबीबीएसची पदवी असेल किंवा पब्लिक हेल्थमध्ये पीएचडी उमेदवाराने केलेली असावी तसेच एमडीमध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार ही अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणच नाही (Government Job) तर वयाची अटही लागू करण्यात आली आहे. 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
अर्जासाठी लिंक –
या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. https://nirrch.res.in/ या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा –
https://nirrch.res.in/wp-content/uploads/2024/04/Advt-Dr-RG-MRHRUVANI-Online_15-05-2024.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे, त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com