करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. अनेक ठिकाणी सरकारी नोकर भरती जाहीर झाली आहे; याविषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहोत. या भरती मध्य प्रदेश उच्च न्यायालय, भारतीय रेल्वे, गुजरात अधीनस्थ निवड सेवा मंडळ इत्यादी ठिकाणी होणार आहेत. ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते संबंधित भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. माहिती घेवूया रिक्त पदे, आवश्यक वयोमर्यादा, पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख याविषयी सविस्तर.
1. रेल्वे मध्ये होतेय शिकाऊ पदावर भरती
रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उत्तर मध्य रेल्वे RRC प्रयागराजने वेगवेगळ्या ट्रेडमध्ये शिकाऊ भरती जाहीर केली आहे. एकूण 1664 पदांवर नियुक्त्या होणार आहेत. अर्ज करणारे उमेदवार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी RRC प्रयागराज rrcpryj.org च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. मध्य प्रदेश उच्च न्यायालय भरती (Government Job)
मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग (प्रवेश स्तर) साठी भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी रीतसर अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक अधिकृत वेबसाइट mphc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करूशकतात. अर्ज सादर करण्याची शेवटकी तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
3. गुजरात निवड मंडळ
गुजरात अधीनस्थ सेवा निवड मंडळाद्वारे 1246 पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. याविषयी संपूर्ण माहिती गुजरात अधीनस्थ सेवा निवड मंडळ ojas.gujarat.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
4. UPSC भरती
युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने अनुवादक आणि सहाय्यक महासंचालक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात. upsconline.nic.in. किंवा तुम्ही upsc.gov.in द्वारे अर्ज करू शकता.
5. नेवेली मध्ये होतेय भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 295 जागा (Government Job) रिक्त आहेत. अभियांत्रिकी विषयात पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांवर ही भरती सेल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना nlcindia.in वर भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com