करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको असते? आपण (Government Job) पाहतो अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कसं? ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.
ही भरती प्रक्रिया दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डकडून राबवली जात आहे. या माध्यमातून थेट 108 पदे भरली जातील. भरती प्रक्रिया सुरु असून सेक्शन अधिकारी (उद्यान)साठी ही भरती होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 7 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यासाठी (Government Job) अवघे काही दिवस शिल्लक असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी dsssb.delhi.gov.in. या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जदार उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान विषयात पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 27 पर्यंत उमेदवाराचे वय असावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com