Government Internship 2024 : जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची मोठी संधी; ‘हे’ विद्यार्थी करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने कोणत्याही शाखेतील (Government Internship 2024) पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिपसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दि. 15 जून 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कोणत्या शाखांमध्ये कामाची संधी दिली जाणार
इंटर्नशिपचा कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्थेची सुविधा मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या पात्रता कौशल्यानुसार मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी अशा विविध शाखांमध्ये काम दिले जाणार आहे.

या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मानधन मिळणार (Government Internship 2024) नसले तरी, महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या इंटर्नशिपद्वारे या सर्व विषयांचा जवळून अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

इंटर्नशिपसाठी अर्ज कुठे करायचा (Government Internship 2024)
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, 17 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-32 येथे बंद पाकिटात सादर करायचा आहे.
पाकिटावर ‘इंटर्नशिपसाठी अर्ज’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.
अर्जाच्या नमुन्यासाठी महसंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर https://mahasamvad.in/?p=127837 जाहिरात पहावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com