Government Hostel : आनंदाची बातमी!! येरवड्यातील शासकीय वसतिगृहात मिळवा ‘मोफत’ प्रवेश; ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । येरवडा येथील मागासवर्गीय (Government Hostel) गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथे प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार
इयत्ता १० वी पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात मोफत (Government Hostel) प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेश हा प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार असणार आहे. वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

इथे मिळेल प्रवेश अर्ज (Government Hostel)
ज्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात मोफत प्रवेश मिळवायचा आहे; अशा विद्यार्थ्यांसाठी ‘मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह’ (नवीन), गोल्फ क्लब, येरवडा-६ येथे प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी इच्छुकांनी वसतिगृहातून प्रवेश अर्ज घेऊन जावे, असे आवाहन मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com