करिअरनामा ऑनलाईन। ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन मग कामावर घेतले जाणार आहे.
क्लासरूम आणि डिजिटल पद्धतीने कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय सप्लाय चेन मॅनेजमेंट बाबत अत्यावश्यक माहिती देखील देण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट ग्राहक सेवा, वितरण, इन्स्टॉलेशन तसंच सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाय याबाबतचे प्रशिक्षण ही देणार आहे. त्याचप्रमाणे पीओएस मशीन, स्कॅनर, विविध मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि ईआरपी यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा म्हणजे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य सुधारेल.
सोमवारी अॅमेझॉनकडूनही ,ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळे आणखी एक लाख लोकांना नोकरी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अॅमेझॉनने सांगितले की नवनियुक्ती पार्ट टाइम किंवा फुल टाइम असेल. यामध्ये ऑर्डरची पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्ट करण्यात मदत करणे या कामांचा समावेश असणार आहे. या नोकर्या हॉलीडे हायरिंगशी संबंधित नाहीत. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीस एक लाख ७५ हजार लोकांना काम दिले होते. १०० नवीन वेअरहाऊसमध्ये पॅकेज सॉर्टींग सेंटर आणि इतर सुविधांसाठी लोकांची गरज असल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. अॅमेझॉनच्या वेअरहाऊसवर देखरेख ठेवणाऱ्या एलिसिया बोलर डेविस यांनी डेट्रॉईट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया केंटकी आणि लुईसविले याठिकाणी कामगार शोधण्यास कठीण असणाऱ्या शहरात कंपनी १००० डॉलरचे साइन ऑन बोनस देणार आहे असे सांगितले. या नोकरीसाठी सुरुवातीचा पगार ताशी १५ डॉलर अर्थात ११०० रुपयांपेक्षा जास्त आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com