UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी पुणे विद्यापीठात सुवर्णसंधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा एकात्मक अभ्यासक्रम (ICAC) अभयासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जातो.

पुणे विद्यापीठाशी अंतर्गत महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिकवलं जाणार असून २०२० – २१ साठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांवर त्यांना प्रवेश दिला जाईल. यामध्ये ८० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन आणि २० टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन माध्यमातून शिकविला जाणार आहे, अशी माहिती प्रा. सी.आर.दास यांनी दिली.

अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय लोकसभा आयोगाची पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत या तीन पातळीवर तयारी करून घेण्यात येईल. लेखन सराव, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषेवर प्राविण्य मिळविण्याकरिता कार्यक्रम ,वादविवाद कार्यक्रम ,चर्चासत्र , वेबिनार या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे.

प्रवेश कसा घ्यावा – 

ऑनलाईन अर्ज करा – https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

स्पर्धा परीक्षा केंद्र संपर्क क्रमांक – 020-25621841/42

ईमेल –  http://[email protected]/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PNB बँकेत नोकरीची मोठी संधी; मॅनेजर पदाच्या 535 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

मुलाखतीला सामोरे जाताय? थांबा! या १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा..