करिअरनामा ऑनलाईन । लष्करात मुलींची संख्या वाढवण्यासाठी महिला आणि पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने काढले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ६ वी साठी मुलींना सैनिकी शाळेत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यामध्ये फक्त सात शाळांचाच समावेश होता. आता या नव्या निर्णयानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मात्र ३३ सरकारी सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.
सैनिकी शाळा ह्या सैनिक स्कूल सोसायटी’अंतर्गत आहेत. तसेच १ फेब्रुवारीला झालेल्या अर्थसंकल्पात आता आणखी १०० शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या १०० शाळा सामाजिक संस्थांमार्फत उभ्या होतील व त्यादेखील याच सोसायटीशी संलग्न होणार असल्याचे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले. सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जात असल्याने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’ (AFMC) सारख्या अकादमीतील निवडीसाठी या मुलींना चांगला फायदा होणार आहे.
सैनिकी शाळांचे शिक्षण हे १२ व्या वर्गापर्यंतच असते. तसेच सैनिकी शाळेतील विध्यार्थी सैनिकांची दरवर्षी चांगल्या संख्येने NDA किंवा नेव्हल अकादमीत निवड होत असते. याखेरीज लष्करी डॉक्टरांना तयार करण्यासाठी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजची परीक्षाही असते. ही परीक्षा सध्या मुले व मुली, असे दोघेही देऊ शकतात. त्यामुळे आता मुलींना सैनिकी शाळेत प्रवेश खुला झाल्यानंतर तेथे शिकणाऱ्या मुली स्वत:ला ‘AFMC’साठी तयारी करू शकतील.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com