करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय (GMC Recruitment 2024) महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
भरले जाणारे पद – गट ड (वर्ग-४)
पद संख्या – 680 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – १०००/- रुपये
2. राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/- रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 15,000/- ते 47,600/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे – (GMC Recruitment 2024)
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12. भुकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
14. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज सादर (GMC Recruitment 2024) करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com