[Gk update] जागतिक भूक निर्देशांक 2020 मध्ये भारत 94 व्या क्रमांकावर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । ग्लोबल हंगर इंडेक्स २०२० मध्ये भारताला 107 राष्ट्रांपैकी 94व्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. 27.2 च्या गुणांसह भारताला GHI प्रमाणातील ‘गंभीर’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. जरी 2000 मधील 38.9, 2006 मधील 37.5 आणि 2012 मध्ये 29.3 च्या तुलनेत स्कोअरमध्ये सुधारणा झाली असली तरी, ती उपासमारीच्याच ‘गंभीर’ पातळीचे प्रतिनिधित्व करते. 

गेल्या वर्षी 117 देशांपैकी भारताची क्रमवारी 102 होती. अहवालानुसार, भारतातील 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. पाच वर्षाखालील मुलांमध्ये देशात 37.4 टक्के वाढ खुंटणे आणि 17.3 टक्के झीज होत  असल्याचेही प्रमाण या अहवालात स्पष्ट झाले आहे. पाच वर्षाखालील मृत्यूचे प्रमाण 7.7 टक्के होते.

शेजारील बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तानदेखील या ‘गंभीर’ प्रकारात आहेत परंतु या वर्षाच्या भूक निर्देशांकात भारतापेक्षा उच्च स्थान आहे. बांगलादेश 75 व्या स्थानावर, म्यानमार व पाकिस्तान 78 व्या आणि 88 व्या स्थानावर आहेत. 73 व्या क्रमांकावर असलेला नेपाळ आणि 64 व्या क्रमांकावर असलेला श्रीलंका ‘मध्यम’ भूक प्रकारात आहे, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

जागतिक भूक निर्देशांकाबद्दल  :-
GHI चे वाजवी मूल्यांकन करण्यासाठी जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर भूक मोजण्यासाठी आणि माग काढण्यासाठी डिझाइन केलेले एक साधन म्हणजे भूक निर्देशांक(GHI) होय.  संयुक्त राष्ट्र संघ (यूएन) आणि इतर बहुपक्षीय एजन्सींकडील डेटा जीएचआय गणनासाठी 4 संकेतकांच्या आधारावर वापरला जातो-
1)कुपोषण
2)पाच वर्षाखालील बालकांची वाढ खुंटणे
3)पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या अवयवांची झीज
4)पाच वर्षाखालील बाल मृत्यू दर