चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना १९५४ ला करण्यात आली होती. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी देण्यात येतो. या वर्षीच्या ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आयुष्मान खुराना आणि विक्की कौशल यांनी अनुक्रमे ‘अंधाधुन’ व ‘उरी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तसेच ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट व ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले.
१. ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री सुरेखा सिकरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार.
२. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर- सामाजिक विषय हाताळणाऱ्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला पुरस्कार
३. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार.
४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार चुंबक चित्रपटासाठी ‘स्वानंद किरकिरे’
५. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘कीर्ति सुरेश’
६. स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ साठी राष्ट्रीय पुरस्कार
७. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
८. ‘अरिजित सिंह’ ठरला सर्वोत्कृष्ट गायक
९. ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार
१०. ‘अंधाधुन’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार.
११. ‘केजीएफ’ ला सर्वोत्कृष्ट अॅक्शन पुरस्कार
१२. ‘पद्मावत’ ला सर्वोत्कृष्ट संगीतचा पुरस्कार
१३. ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घुमर’ला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन पुरस्कार
१४. आदित्य सुहास यांच्या ‘खरवास’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शॉर्ट चित्रपट (फीचर) पुरस्कार
१५. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार ‘भोंगा’.
१६. मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट ‘उत्तराखंड’.
१७. सर्वोत्कृष्ट पर्यावरण/कॉन्सरवटिव्ह/प्रेसेर्व्हशन चित्रपट ‘पाणी’.
१८. सर्वोत्कृष्ट संगीत महिला ‘ज्योति’.
१९. ‘संजय लीला भंसाली’ ला सर्वोत्कृष्ट म्यूजिक डायरेक्टर.
इतर महत्वाचे-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती
संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती
मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती
नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती
हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी