Gig Jobs in India : सणासुदीच्या काळात नोकऱ्यांची होणार खैरात!! 7 लाख लोकांना मिळणार नोकऱ्या 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशात सध्या सणासुदीची धामधूम (Gig Jobs in India)  सुरु आहे. या दरम्यान देशभरात नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या तसेच कित्येक दुकानांमध्ये सेल सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कित्येक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची नोकर भरती होत आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे तब्बल 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डने दिली आहे. या हंगामामध्ये असे आणखी 3 लाख जॉब्स तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यावर्षी गिग जॉब्समध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022 सालच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये डिसेंबरपर्यंत असे 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले होते. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच हा आकडा गाठला गेला आहे.
यंदा आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप देखील भारतात होत आहे. या माध्यमातून देखील सुमारे एक लाखांहून अधिक गिग जॉब्स तयार झाले आहेत. डिलिव्हरी, ट्रान्सपोर्टेशन, हॉस्पिटॅलिटी आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये नोकऱ्या तयार झाल्या आहेत.

गिग जॉब्स वाढीमध्ये ई-कॉमर्स साईट्सचा मोठा (Gig Jobs in India) वाटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास एकट्या अमेझॉनने आतापर्यंत भारतात एक लाखांहून अधिक सीझनल नोकऱ्या तयार केल्याचं म्हटलं होतं. यासोबतच फ्लिपकार्टनेही एक लाख नवीन नोकऱ्या तयार केल्याचं स्पष्ट केलं आहे. या दोन्ही कंपन्यांचे मोठे सेल सध्या सुरू आहेत. तसंच दिवाळी अन् नाताळच्या आसपास देखील पुन्हा मोठ्या सेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com