GATE Exam 2023 : GATE परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पेपर पॅटर्न याविषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। देशातील इंजिनिअर्ससाठी सर्वात मोठी बातमी आहे. इंजिनिअरिंग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन (GATE Exam 2023) किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी होणाऱ्या GATE परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. GATE 2023 साठी हे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दरवर्षी ही परीक्षा इंजिनिअरिंगच्या विविध ब्रांचेससाठी घेण्यात येते. Mtech किंवा इतर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी किंवा PSU मध्ये नोकरी करण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया असते. आता GATE परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन आजपासून सुरु करण्यात आलं आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करावं? आणि परीक्षेचं पेपर पॅटर्न कसं असेल याबद्दल जाणून घेऊया.

काही महत्वाच्या तारखा –

ऑनलाइन अर्ज प्रोसेस सुरु होण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2022

नियमित ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख – 30 सप्टेंबर 2022

विस्तारित ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख – 07 ऑक्टोबर 2022

GATE 2023 अर्जामध्ये बदल – 04 नोव्हेंबर – 11 नोव्हेंबर 2022

डाउनलोड करण्यासाठी GATE प्रवेशपत्रांची उपलब्धता – 03 जानेवारी 2023

GATE 2023 परीक्षा – 4, 5, 11, 12, फेब्रुवारी 2023

अर्ज पोर्टलवर उमेदवारांचा फीडबॅक – 15 फेब्रुवारी 2023

अॅप्लिकेशन पोर्टलवर आन्सर कि – 21 फेब्रुवारी 2023

आन्सर कि ला चॅलेंज करण्याची तारीख – फेब्रुवारी 22 – 25, 2023

GATE 2023 च्या निकालांची घोषणा – 16 मार्च 2023

उमेदवारांकडून डाउनलोड करण्यासाठी स्कोअर कार्डची उपलब्धता – 21 मार्च 2023

रजिस्ट्रेशनची प्रक्रिया – (GATE Exam 2023)

  1. gate.iitk.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
  2. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या “GATE 2023 Registration” या लिंकवर क्लिक करा.
  3. पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.
  4. एकदा नोंदणीकृत झाल्यावर, सिस्टम-व्युत्पन्न आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  5. GATE 2023 अर्ज भरा.
  6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  7. उमेदवारांनी अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
  8. एकदा तुम्ही अर्जाची फी भरली की, फॉर्म सबमिट करा.
  9. GATE 2023 अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

असं असेल पेपर पॅटर्न –

  1. GATE 2023 29 पेपरसाठी घेण्यात येईल.
  2. प्रत्येक GATE 2023 पेपर एकूण 100 गुणांचा आहे.
  3. जनरल अ‍ॅप्टिट्यूड (GA) सर्व पेपर्ससाठी (15 गुण) सामान्य आहे आणि उर्वरित पेपर संबंधित अभ्यासक्रम (85 गुण) समाविष्ट करतात.
  4. GATE 2023 परीक्षांचे सर्व चाचणी पेपर पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com