करिअरनामा ऑनलाईन । GATE 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या (GATE 2025) उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुढील सत्रासाठी GATE परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकीद्वारे आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी 24 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट gate.iitr.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज भरण्याची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज करण्याचा कालावधी
जे उमेदवार 26 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकणार (GATE 2025) नाहीत त्यांना विलंब शुल्कासह नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विलंब शुल्कासह नोंदणी करु शकतात. त्यासाठी उमेदवाराला अतिरिक्त शुल्क म्हणून अतिरिक्त ५०० रुपये जमा करावे लागतील. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1,800 रुपये आणि विलंब शुल्कासह अर्ज केल्यास 2,300 भरावे लागतील. तसेच SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क असून विलंब शुल्कासह अर्ज केल्यास 1,400 रुपये जमा करावे लागतील.
असा करा अर्ज (GATE 2025)
1. GATE 2025 परीक्षेस नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट gate.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल.
2. वेबसाइटच्या होम पेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करून आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
3. यानंतर तुम्हाला इतर तपशील, छायाचित्र, स्वाक्षरी इत्यादी अपलोड करावे लागतील.
4. विहित शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com