Girls Sainik School : इथे सुरु झाली देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा; अशी आहेत शाळेची खास वैशिष्ट्ये

Girls Sainik School
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशातील पहिली गर्ल्स सैनिक स्कूल (Girls Sainik School) कोठे सुरु झाली; हे जाणून घेण्याबाबत तुम्ही उत्सुक असाल. या लेखामध्ये आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा मथुरामध्ये स्थापन करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतेच या शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे सैन्यात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींसाठी ही शाळा म्हणजे आशेचा किरण म्हणावी लागेल. सशस्त्र दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा असलेल्या मुलींना याशाळेत प्रवेश घेता येणार आहे.

870 विद्यार्थिनींना दिले जाणार प्रशिक्षण
या कंत्राटी गुरुकुलम्  सैनिक शाळेत 870 विद्यार्थिनींना शिक्षण व प्रशिक्षण दिले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानूसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये NGO/खाजगी/राज्य सरकारी शाळांच्या भागीदारीत 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे; त्यापैकी आणखी 42 शाळा स्थापन करायच्या आहेत. या शाळा विद्यमान 33 सैनिक स्‍कूलच्‍या व्यतिरिक्त बांधल्‍या जात आहेत, जे आधीपासून पूर्वीच्‍या पॅटर्न अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रम चालवत आहेत.

शाळेची वैशिष्ट्ये (Girls Sainik School)
1. देशातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेत इयत्ता 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिले जाणार आहे.
2. देशातील माजी लष्कर आणि एनसीसी अधिकारी मुलींना लढाऊ कौशल्याचे प्रशिक्षण देतील.
3. CBSE बोर्डाचे शिक्षणही या शाळेत दिले जणार आहे.
4. येथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच युद्ध धोरणेही शिकवली जाणार आहेत.
5. या शाळेचे पहिले सत्र (Girls Sainik School) एप्रिलपासून सुरु होणार आहे.
6. त्यासाठीची लेखी परीक्षा दि. 21 जानेवारीला होणार आहे.
7. अर्जाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com