करिअरनामा ऑनलाईन। टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी (Facebook) ट्विटरची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते आणि ही भीती आता खरी ठरणार आहे. एलन मस्क यांनी नोकरकपात केली त्या पाठोपाठ आता मेटा अंतर्गत येणाऱ्या फेसबूकमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.
काय आहे कारण? (Facebook)
मेटा गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे, त्यामुळे खर्च कमी करण्याकडे कंपनीचा कल वाढला आहे. यावर्षी मेटाचे शेअर्स 73 टक्क्यांनी घसरले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आणि महागाई वाढली आहे. त्यामुळे मेटाला आर्थिक संकटांचा सामना करावा (Facebook) लागत आहे. या कारणांमुळे फेसबूकमध्ये मोठया प्रमाणावर कर्मचारी कपात होणार आहे. अशी माहिती मिळत आहे.
या संदर्भात एक एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. या माहितीनुसार मेटाने कर्मचाऱ्यांना याबाबत आधीच पुर्वकल्पना दिली होती. सप्टेंबरच्या अखेरीस मेटाने जगभरात 87,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com