3 Year Law CET Exam Date 2024 : LLB तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 24 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

3 Year Law CET Exam Date 2024
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमास (3 Year Law CET Exam Date 2024) प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Cell) कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात सुमारे 18 हजारांपेक्षा जास्त जागा (3 Year Law CET Exam Date 2024)
एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमांसाठी राज्यात सुमारे 18 हजारांपेक्षा जास्तीच्या जागा आहेत. १८ हजार जागांसाठी आत्तापर्यंत जवळपास ८० हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विधी 3 वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी सुरवातीला ११ ते १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. यावेळी केवळ ४० हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ३४ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली. उमेदवार नोंदणी पाहाता सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा आकडा दुप्पट झाला. मात्र, पुन्हा एकदा विद्यार्थी आणि यांच्या मागणीनंतर मुदतवाढ देण्यात आली आहे.

पावसामुळे निर्माण होतायत तांत्रिक अडचणी
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निम्म्या विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरला आहे. राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्याची (3 Year Law CET Exam Date 2024) मागणी केली. नोंदणीला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन सीईटी कक्षाने विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणीस २४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अर्ज नोंदणी करावी; असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com