Ex-Serviceman Degree Course : माजी सैनिकांना ‘या’ विद्यापीठाकडून घेता येणार ‘BA’ ची पदवी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात (Ex-Serviceman Degree Course) करार झाला असून, त्याद्वारे माजी सैनिकांना विविध नोकरीच्या संधीस पात्र होण्यासाठी कला शाखेतून BA (HRM) पदवी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
देश रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी सक्षम बनविणे या उद्देशाने केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठात हा करार करण्यात आला. हे पदवी (Ex-Serviceman Degree Course) प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमांच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार आहे. परंतु, त्यास पात्र ठरण्यासाठी माजी सैनिकाने इयत्ता 12वी किंवा समतूल्य शिक्षण घेतलेले असावे.

ही पात्रता आवश्यक
उमेदवाराकडे भारतीय आर्मी, नेव्ही, एअर फोर्सद्वारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र असायला हवे. माजी सैनिकांची सेवा 15 वर्षांपेक्षा कमी नसावी. 1 जानेवारी 2010 नंतर ते निवृत्त झालेले असावेत.
संबंधित माजी सैनिक 10वी उत्तीर्ण असेल तर त्यांना (Ex-Serviceman Degree Course) पाच वर्षांचा अभ्यासक्रम लागू राहील. या अभ्यासक्रमाची फी 12 हजार 500 रुपये असून, अर्जदाराने आपले अर्ज एप्रिल अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यातच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन कापले यांनी केले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com