Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादी
MHT CETचा निकाल जाहीर झाल्यानंतर CET CELLकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली (Engineering Admission 2024) आहे. विद्यार्थ्यांना आता ३० जुलैपर्यंत नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 3 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी आठ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यानंतर प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे; असे सीईटी सेलने सांगितले आहे.

इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
प्रवेशा संदर्भात महत्वाच्या तारखा (Engineering Admission 2024) –
१. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी – दि. ३० जुलैपर्यंत
२. कागदपत्रांची पडताळणी : दि. ३१ जुलैपर्यंत
३. प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. ३ ऑगस्ट
४. यादीवर हरकती व तक्रार – दि. ४ ते ६ ऑगस्ट (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
५. अंतिम गुणवत्ता यादी – दि. ८ ऑगस्ट
( टीप – पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.)
गेल्या वर्षी राज्यातील ३५० कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी एक लाख १७ हजार ५८५ जागांवर प्रवेश झाले होते. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ होऊ शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com