Educational Scholarship : आता शिक्षणाची चिंता सोडा!! विद्यार्थीनींना मिळणार 1 लाखांपर्यंत स्कॉलरशिप; ‘ही’ पात्रता आवश्यक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थिनींच्या शिक्षणा संदर्भात (Educational Scholarship) एक अत्यंत महत्वाची अपडेट हाती आली आहे. गुणवंत विद्यार्थीनी, अपंग विद्यार्थीनी, कोविड-प्रभावित विद्यार्थीनी, LGBTQ विद्यार्थीनी, अनाथ विद्यार्थीनी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 प्रदान करण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

1 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार
लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून याद्वारे हुशार विद्यार्थीनींना 1 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार आहे.

‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज (Educational Scholarship) –
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. त्यासाठी 5 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश हा गुणवंत विद्यार्थीनी, अपंग महिला विद्यार्थी, कोविड-प्रभावित विद्यार्थी, LGBTQ विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही स्काॅलरशिप दिली जाते.

कोणासाठी आहे शिष्यवृत्ती? काय आहे पात्रता?
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम फक्त भारतातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी आहे. अर्जदाराने भारतातील B.Tech, BE, B.Arch, BBA, B.Com किंवा B.Sc पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे (Educational Scholarship) आवश्यक आहे. अर्जदाराने 2023-24 या शैक्षणिक वर्षात 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले असावेत. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, असे निकष सामान्य श्रेणीतील विद्यार्थीनींसाठी आहेत.

सामान्य श्रेणीसाठी शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विद्यार्थिनींना (Educational Scholarship) अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत 60 टक्के अभ्यासक्रम शुल्क, दरवर्षी कमाल 60 हजार रुपये दिले जातील. तर विशेष श्रेणीसाठी शेक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांना 80 टक्के अभ्यासक्रम शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति वर्ष कमाल 1 लाख रुपये दिले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com