Educational Scholarship : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’साठी मागवण्यात आले अर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय (Educational Scholarship) व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अभ्यास करण्यासाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. या पार्श्वभूमीवर 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी दी. 12 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची ही अत्यंत महत्वाची योजना आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (Educational Scholarship) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. यापैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

मिळणार या सुविधा (Educational Scholarship)
या योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना, विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे.

काय आहे आवश्यक पात्रता
अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या वेबसाईट वरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. त्याचबरोबर या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.

कुठे आणि कसा करायचा अर्ज
विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या पर्यायावर क्लिक करून प्राप्त झालेल्या (Educational Scholarship) लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यायचा आहे. सदर परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालय 3 येथे सादर करावा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com