करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतच्या (Educational Scholarship) मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य मिळावे; या हेतूने ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शाळकरी मुलींना 600 रुपयांपासून 3 हजारांपर्यंतची आर्थिक मदत सरकार करत आहे. त्यामुळे या योजनेचा अधिक मुलींनी लाभ घ्यावा; असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. जाणून घेवूया सविस्तर…
या विद्यार्थिनींना होणार शिष्यवृत्तीचा फायदा
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सर्व (Educational Scholarship) शाळांमधून समाज कल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठवण्यात येते. या माहितीची पडताळणी केल्यानंतर विभाग शिष्यवृत्ती मंजूर करते. पुढे मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींच्या थेट बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम पाठवण्यात येते. परंतु या शिष्यवृत्तीचा लाभ फक्त पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना घेता येत आहे. यासाठी मुलींची वर्गातील दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे.
काय आहे पात्रता (Educational Scholarship)
मुख्य बाब म्हणजे, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींची किमान 75 टक्के उपस्थिती असल्यासच त्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यास समाज कल्याण विभाग मंजूरी देते. आणि अशा मुलींचीच नावे शाळेकडून पाठवण्यात येतात. या शिष्यवृत्ती अंतर्गत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना 600 रुपये दिले जातात. तसेच, आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना प्रतिवर्षाला 1 हजार रुपये शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येते.
ही कागदपत्रे आहेत आवश्यक
सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. यासोबत 1. विद्यार्थिनीच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला 2. मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला 3. जातीचा दाखला 4. बँक खाते; अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com