Educational Fraud : शिक्षण क्षेत्राला हादरा!! पुण्यात CBSE बोर्डाच्या तीन शाळा बोगस; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात बोगस (Educational Fraud) शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल तीन CBSE म्हणजेच Central Board of Secondary Education च्या शाळा बोगस असल्याचं समोर आलंय. या शाळांकडे शासनाचं बोगस प्रमाणपत्र आढळून आलं आहे. शिक्षणविभागानं या बोगस शाळांची नावं जाहीर केली असून कारवाईचा बडगा उगारलाय.

पुण्यातील CBSE बोर्डाच्या या तीन शाळा बोगस (Educational Fraud)

पुणे जिल्ह्यातील एम.पी.इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं (Educational Fraud) पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अशी या बोगस शाळांची नावं आहेत. शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी या बोगस शाळांची यादी जाहीर केली आहे.

बारा लाखात मिळवलं बोगस प्रमाणपत्र

या तिन्ही CBSE इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे शासनाचे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे बारा लाख (Educational Fraud) रुपयात बनावट एनओसी (NOC) देणारी टोळी कार्यरत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. तसंच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचं शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सांगितलं. तसंच प्रत्येक सीबीएससी (Educational Fraud) शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. तसंच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या असल्याचं शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सांगितलं आहे. तसंच प्रत्येक CBSE शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com