Education : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘हे’ तीन अभ्यासक्रम शिकता येणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Education) फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बौद्धिक संपदा अधिकार, औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत; अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘बौद्धिक संपदा अधिकार’ या अभ्यासक्रमात पेटंट कायदा, ट्रेडमार्क कायदा, नोंदणी प्रक्रिया, औद्योगिक डिझाईन नोंदणी, कॉपीराईट या विषयांचा समावेश असेल. पदवी घेणारे विद्यार्थी किंवा या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. ‘औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स’मध्ये नवीनतम (Education) जैवसंगणकीत साधने आणि तंत्रांचा वापर करून व्यावहारिक अनुभव मिळेल. ज्यामुळे जैविक डेटाचे प्रभावी विश्लेषण आणि अर्थ लावणे सोपे जाईल. विज्ञान शाखेतील पदवीधर, फार्मसी, एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, संगणक विज्ञान या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

‘जिओ इकॉनॉमिक्स’ या (Education) अभ्यासक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण व अर्थनीती, दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण व विकासात्मक प्रश्न या विषयांचा समावेश असेल. पदवी किंवा त्यापुढील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तीनही अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी www.fergusson.edu या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com