Education : खुशखबर!! UK मध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांना आता 15 दिवसांत मिळणार Visa; पहा कसं?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्ही UK मध्ये अभ्यासासाठी जाण्याचा विचार करत असाल (Education) तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम अवघ्या 15 दिवसांत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याची तयारी करत आहे. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी UK Student Visa च्या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना यूके व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया पुन्हा रुळावर आल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांना फक्त 15 दिवसांत व्हिसा मिळू शकतो. कोविड आणि त्यानंतर झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे लादलेल्या निर्बंधानंतर ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे.

ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस व्हिडिओमध्ये म्हणत आहेत, ‘हॅलो, व्हिसावर अपडेट करा. तुम्हाला माहिती आहे की, कोविड-19 आणि रशिया युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितींमध्ये व्हिसाला उशीर झाला होता. दरम्यान, भारतातून यूकेला जाणाऱ्यांच्या व्हिसाच्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पण आता आम्ही पुन्हा पूर्वपदावर आलो आहोत.

व्हिसासाठी अर्ज वाढले (Education)

अॅलेक्स यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थ्यांनी यूकेमध्ये शिकण्यासाठी दिलेल्या स्टुडंट व्हिसा अर्जांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की, ‘कुशल कामगार व्हिसावरही लवकरात लवकर प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय, आम्ही UK व्हिजिटर व्हिसाच्या प्रक्रियेची वेळ कमी करण्यावरही काम करत आहोत.

विद्यार्थ्यांना मदतीचं आवाहन

या माहितीसह अॅलेक्स यांनी विद्यार्थ्यांची मदतही मागितली आहे. ते म्हणतात, ‘आम्ही तुम्हाला 15 दिवसांत व्हिसा देऊ शकू. यासाठी तुमच्या सहकार्याचीही गरज आहे. तुम्ही तुमचा व्हिसा अर्ज 03 महिने (Education) अगोदर सबमिट करणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक माहिती देवून अर्ज वेळेत सबमीट करणं गरजेचं आहे.

ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की, “विद्यार्थ्यांना व्हिसासाठी घाई असेल तर ते आमच्या प्रायॉरिटी व्हिसा सर्व्हिस आणि सुपर प्रायॉरिटी व्हिसा सेवेची सुविधा घेऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस सर्व (Education) प्रकारच्या व्हिसाची मानक वेळ 15 दिवसांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com