Education : मराठीतून इंजिनीअरिंग शिकण्याचा पर्याय यशस्वी; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतोय फायदा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मराठीतून इंजिनीअरिंग शिकण्यासाठी (Education) सुरू करण्यात आलेल्या विशेष तुकडीला विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद दिला असून, यंदा प्रवेश घेण्यासाठीचे कट ऑफ गुण 95 टक्के होते. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (पीसीसीओई) सुरू झाल्यावर, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे त्यामुळे संपूर्ण जागांवर प्रवेश झाले असून, मराठीतून इंजिनीअरिंगचा पर्याय यशस्वी होताना दिसत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. हाच धागा पुढे नेत, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण प्रादेशिक (Education) भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) आवाहनानुसार गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यात ‘पीसीसीओई’ या स्वायत्त कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मराठीतून देण्याचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. त्यासाठी गेल्या वर्षी 67 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

यातील अनेक विद्यार्थी राज्यातील ग्रामीण भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून, उत्तीर्णांचे प्रमाण 85 टक्के आहे. मराठीतून शिक्षणाचे धडे मिळत असल्याने, ग्रामीण भागातील इंजिनीअरिंगच्या संकल्पना आणि प्रोग्रॅम हे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे, असे ‘पीसीसीओई’चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

यावर विशेष लक्ष – (Education)

  1. मराठीतून पुस्तके उपलब्ध करून देणे
  2. ‘एआयसीटीई’च्या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मुबलक पुस्तके उपलब्ध
  3. वर्गात मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून शिक्षण देणे (Education)
  4. परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे पर्याय
  5. प्लेसमेंटच्या दृष्टीने अंतिम वर्षापर्यत इंग्रजीसोबतच परदेशी भाषांचे शिक्षण

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com