करिअरनामा ऑनलाईन। देशात शिक्षण घयायचे असो की परदेशात कॉलेजची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे (Education) नसतील तर विद्यार्थी आणि पालकांसमोर एकमेव पर्याय असतो तो म्हणजे शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा. आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी Education Loan म्हणजे वरदानच आहे. अनेकदा बँकेत Education Loan साठी गेल्यानंतर आपल्याला कागदपत्रांसाठी परत पाठवण्यात येतं. अशावेळी निराशा होते. जर ते कागदपत्र आपल्याकडे असतील तर ते तयार करण्यापासून सर्व काम आपल्याला करावं लागतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही कागपत्रांची यादी सांगणार आहोत जे Education Loan घेण्याच्या वेळी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. वाचा सविस्तर…
शिक्षणासाठी कर्ज कोणाला मिळू शकतं?
- Education Loan लोन मिळवण्यासाठी काही निकषांवर पात्र ठरणं आवश्यक आहे.
- कोणत्याही भारतीय बँकेतून Education Loan घेण्यासाठी आपण प्रथम भारतीय नागरिक असणं महत्त्वाचं आहे.
- वय 16 ते 35 वर्ष असणं महत्त्वाचं आहे.
- तुम्ही करू इच्छिणाऱ्या कोर्समध्ये तुम्हाला एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून प्रवेश मिळाला असणं महत्त्वाचं आहे.
- किती मिळू शकतं कर्ज?
- भारतात उच्च शिक्षणासाठी जास्तीत जास्त 10-15 लाख इतकं कर्ज मिळू शकतं.
- तर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
आवश्यक कागदपत्रे – (Education)
- आपण ज्या कोर्ससाठी आणि कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहात, त्या कोर्सचं प्रवेश पत्र आणि महाविद्यालयाची संपूर्ण माहिती.
- कोर्स शुल्काबाबत (course fee) सविस्तर माहिती असणारे कागद.
- मार्कशीटची प्रत आणि त्याच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं.
- वयाचा दाखला
- ओळखपत्र
- जर तुमचे त्या संबंधित बँकेत अकाउंट नसेल तर तुम्हाला Address Proof द्यावं लागेल.
- पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा.
- नोकरीवर असल्यास मागच्या दोन महिन्यांचं सॅलरी स्लिप.
- व्यवसाय असल्यास मागील सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट.
- दोन पासपोर्ट साईज फोटो.
- परदेशात अभ्यासासाठी जात असल्यास पासपोर्ट आणि व्हिसाची कॉपी.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com