करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणातील आधुनिकीकरणाच्या (Education) दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये Artificial Intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाचा समावेश केला आहे. राज्य सरकारने इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) अभ्यासक्रमात AI शिकण्याचे मॉड्यूल उपलब्ध करून दिले आहे. या संदर्भातील योजनांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनने (KITE) प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे केरळमधील 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात AI च्या क्षेत्रात सखोल अभ्यास करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
80 हजार शिक्षकांना मिळणार AI प्रशिक्षण (Education)
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनने 2 मे पासून 80 हजार माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण सुरू केले आणि आतापर्यंत 20 हजार 120 शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनचे CEO अन्वर सदाथ म्हणाले; इयत्ता 1 ली आणि 3 रीच्या नवीन ICT पाठ्यपुस्तकांमध्ये FOSS (फ्री आणि ओपन-सोर्स सॉफ्टवेअर) आधारित शैक्षणिक ऍप्लिकेशन्स जसे की GCompris, eduActiv8, OmniTux आणि TuxPaint या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यामध्ये रेखाचित्र, वाचन, भाषा शिकणे, संख्या, ऑपरेशन्स आणि लय इ. कौशल्ये शिकता येतील.
AI शिक्षक ही संकल्पना अंमलात आणणारे केरळ पहिले राज्य
या आधी सर्वप्रथम केरळ सरकारने AI शिक्षक ही संकल्पना अंमलात (Education) आणली होती ज्याची देशभर मोठी चर्चा झाली होती. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग, एआय, रोबोटिक्स इत्यादींचा सराव करता यावा यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘पिक्टोब्लॉक्स’ पॅकेजसह ‘स्क्रॅच’ सॉफ्टवेअर आणण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com