Education : ‘ही’ संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सरसावली; करून घेते ‘NEET’ परीक्षेची तयारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. ही अत्यंत (Education) कठीण परीक्षा असते. यामध्ये उत्तीर्ण होणं सोपं नसलं तरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातल्या ‘फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये’ शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो आणि परीक्षेची तयारी करून घेतली जाते.

फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूट

भारत-पाकिस्तानची सीमा म्हटलं, की लष्करी छावण्या, बंदुका, गोळ्या, सैनिक वगैरे बाबी डोळ्यांसमोर येतात; मात्र याच सीमेवर बंदुका आणि गोळ्यांशी काहीही संबंध नसलेली (Education) एक संस्था कार्यरत आहे. तिथे आरोग्याच्या सुरक्षेसाठी ज्ञान दिलं जातं. या संस्थेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट (NEET) परीक्षेची तयारी करून घेतली जाते. नीट परीक्षेबाबत शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी ही सर्वोत्तम अशी एक संस्था आहे. फिफ्टी व्हिलेजर्स सर्व्हिस इन्स्टिट्यूट असं त्याचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावं, यासाठी ही संस्था त्यांना मदत करते.

यावर्षी 27 विद्यार्थी यशस्वी (Education)

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे. यंदा जुलै महिन्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यामध्ये या संस्थेतल्या 27 विद्यार्यांनी यश मिळवलेलं आहे. संस्थेची स्थापना 10 वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून आतापर्यंत इतक्या कमी वेळात संस्थेतून शिक्षण घेतलेले 65 विद्यार्थी आज डॉक्टर बनले आहेत.

2012 मध्ये झाली स्थापना

डॉ. भरत सरन आणि त्यांच्या टीमद्वारे 2012 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिकण्यासाठीचं साधन नसल्यामुळे जे विद्यार्थी डॉक्टर बनू शकत नाहीत, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा या (Education) संस्थेचा उद्देश होता. दर वर्षी 10वी उत्तीर्ण केलेल्या 50 गरीब विद्यार्थ्यांची निवड यासाठी केली जाते. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय घेऊन सरकारी कॉलेजमध्ये 11वी-12वीसाठी प्रवेश मिळवून दिला जातो. मग त्यांना ‘नीट’साठी शिक्षण दिलं जातं.

गरजू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण

शिकण्याची इच्छा असलेल्या प्रतिभावान पण गरीब विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश दिला जातो. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचं सुरू असलेलं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे, त्यांनाही यात प्रवेश मिळतो. त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं जातं. अनेकदा मजुरी करून कुटुंबाचं पोट भरणारे विद्यार्थीही स्वतःचं शिक्षण इथून पूर्ण करतात. एक वेळ उपाशी राहणारे, प्रसंगी रस्त्यावर झोपायची वेळ आलेले, चहाच्या (Education) टपरीवर काम केलेले विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असणारी ही संस्था समाजाच्या आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातल्या गरजू, पण प्रतिभावान विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मदत करते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com