करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का देशातल्या काही (Education) विद्यापीठांमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच CET शिवायही प्रवेश घेता येऊ शकतो. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं काही विद्यापीठांना प्रवेश परीक्षा न घेता प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CUET) अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यानं या परीक्षेसाठीही JEE किंवा NEET परीक्षेप्रमाणे स्पर्धा वाढली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2022ला या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; मात्र काही विद्यापीठांनी अद्याप CUET साठी नोंदणी केली नसल्याने विद्यार्थ्यांना तिथे परीक्षेविना प्रवेश मिळू शकतो.
या विद्यापीठांनी प्रवेश परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी शिक्षण मंत्रालयाकडून घेतली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमधल्या काही विद्यापीठांना (Education) केंद्रानं CUET UG 2023 या परीक्षेतून वगळलं आहे. उत्तराखंडमधल्या हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठाचा त्यात समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांची कमतरता असल्यानं केंद्रानं विद्यापीठांच्या संबंधित प्रबंधकांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत.
पुढील विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश घेता येवू शकतो – (Education)
- सिक्कीम युनिव्हर्सिटी
- राजीव गांधी युनिव्हर्सिटी
- मणिपूर युनिव्हर्सिटी
- आसाम युनिव्हर्सिटी
- तेजपूर युनिव्हर्सिटी
- नागालँड युनिव्हर्सिटी (Education)
- त्रिपुरा युनिव्हर्सिटी
- मिझोराम युनिव्हर्सिटी
- नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी (NEHU)
- हेमवी नंदन बहुगुणा गढवाल युनिव्हर्सिटी, उत्तराखंड (HNBGU)
केंद्रीय विद्यापीठांमध्ये सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टिंग अकॅडमीतर्फे कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. देशाच्या सर्व भागांतल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे समान संधी समान व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो.
देशातल्या काही केंद्रीय विद्यापीठांमध्ये व इतर (Education) विद्यापीठांमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास देशभरातल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणं शक्य होतं. केंद्रीय शिक्षण मंत्रायलयानं सर्व विद्यापीठांना ही प्रवेश परीक्षा घेण्याबाबत सक्ती केली आहे; मात्र काही विद्यापीठांना त्यातून वगळलं आहे. त्यामुळे त्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. या परीक्षेसाठी यंदाची नोंदणीही झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर याबाबतची अधिक माहिती व इतर तपशील विद्यार्थ्यांना जाणून घेता येतील. प्रवेश परीक्षेबाबतची माहितीही विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होऊ शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com