Earn and Learn Scheme : ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ; विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांच्या श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देऊन (Earn and Learn Scheme) विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतूने सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावरील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना यंदापासून दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यापीठात अनेक वर्षांपासून ही योजना राबविली जाते. अशा प्रकारची योजना राबविणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे. सध्या 500 विद्यार्थी या योजनेअंतर्गत कार्यरत असून, मानधन वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यापीठातील विविध (Earn and Learn Scheme) शैक्षणिक विभागात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतात.

विद्यापीठात प्रवेश घेणारे बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. यामध्ये कुटुंबातील परिस्थिती विचारात घेऊन विविध कामे करून उच्च शिक्षण घेणारे (Earn and Learn Scheme) अनेक विद्यार्थी आहेत. योजनेत प्रवेशासाठी विभागांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती, उच्च शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन योजनेत सहभागी करून घेण्यात येते.

असं असतं कामाचं नियोजन (Earn and Learn Scheme)

‘कमवा आणि शिका’ या योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दररोज दोन तास काम करावे लागते. त्या बदल्यात त्यांना 70 रुपये दिले जातात. या पैशातून विद्यार्थ्यांना (Earn and Learn Scheme) शैक्षणिक खर्च भागवण्यास मदत होते. अनेक दिवसांपासून मानधन वाढविण्याबाबतची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता हे मानधन 100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

काय असतं काम

प्रशासकीय कामकाजात वापरली जाणारी पाकिटे, फाइल असे शैक्षणिक साहित्य तयार करणे, ग्रंथालय आणि इतर विभागांतील कामे करणे यांसह कमवा व शिका योजनेची शेती असून, शेतीतील कामे, स्वच्छता, साफसफाईची कामे योजनेतील विद्यार्थी (Earn and Learn Scheme) करतात. या कामाच्या मोबदल्यातून मिळणाऱ्या पैशातून शालेय साहित्य खरेदी, प्रवास, मेस, हॉस्टेल अशा प्रकारचा खरच भागवण्यास मदत होत असते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com