Driver Job : राज्य शासनाची मेस्को देणार वाहन चलकांना नोकरी!! 60 पदांवर होणार भरती; महिन्याचा 31,314 पगार 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड परिसरातील विविध (Driver Job) रुग्णालये आणि फायर पॉईंट येथे एकूण 60 वाहन चलकांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातून नेमणूक करावयाची आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – मेस्को (MESCO, पिंपरी चिंचवड)
भरले जाणारे पद – वाहन चालक
पद संख्या –६० पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.
मुलाखतीची तारीख – 1 सप्टेंबर 2023
मिळणारे वेतन – 31,314/- रुपये दरमहा

अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (Driver Job) आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
3. वरील पदांकरीता मुलाखत 1 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
4. सदर नेमणूक ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.

काही महत्वाच्या लिंक्स – (Driver Job)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mescoltd.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com