DRDO DMRL Recruitment 2024 : ITI केलेल्या उमेदवारांना संरक्षण धातू संशोधन प्रयोग शाळेत सरकारी नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत (DRDO DMRL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 127 रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ITI पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

संस्था – संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा
पद संख्या – 127 पदे
भरले जाणारे पद – आयटीआय प्रशिक्षणार्थी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024

रिक्त पदांचा तपशील –
1) फिटर / Fitter – 20 पदे
2) टर्नर / Turner – 08 पदे
3) मशिनिस्ट / Machinist – 16 पदे
4) वेल्डर / Welder – 04 पदे (DRDO DMRL Recruitment 2024)
5) इलेक्ट्रीशियन/ Electrician – 12 पदे
6) इलेक्ट्रॉनिक्स / Electronics – 04 पदे
7) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator and Programming Assistant 60
8) सुतार / Carpenter – 02 पदे
9) बुक बाइंडर/ Book Binder – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)
परीक्षा फी – फी नाही (DRDO DMRL Recruitment 2024)
निवड प्रक्रिया –
1. गुण (Merit Basis)
2. मुलाखत
3. दस्तऐवज पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स – (DRDO DMRL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://drdo.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com