करिअरनामा ऑनलाईन । दहावीपर्यंत जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांच्या मनात हे स्पष्ट होते की त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जायचे आहे. करिअरच्या या नियोजनानुसार बारावीतील विज्ञान, वाणिज्य किंवा कला विषयातील विषयांची निवड केली जाते. आजकाल तरुणांमध्ये जॉब ओरिएंटेड कोर्सची लोकप्रियता खूप वेगाने वाढत आहे. येथे आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत जे दहावीनंतर केले जाऊ शकतात. दहावीनंतर असे बरेच कोर्स आहेत, ज्यांना केल्यानंतर चांगली नोकरी मिळवता येते. डिप्लोमा कोर्सची खास गोष्ट म्हणजे त्यात जास्त वेळ लागत नाही. तसेच हे अगदी कमी फीवरही करता येते. बहुतेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांची माहिती नसते. या पोस्टमध्ये आम्ही अशा काही अभ्यासक्रमांबद्दल सांगु.
आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा
दहावीनंतर आर्किटेक्चर होण्यासाठी डिप्लोमा इन आर्किटेक्चर कोर्स करता येतो. यामध्ये इमारतीचे बांधकाम, डिझाइन, रचना यावर काम केले जाते. जे विद्यार्थी अत्यंत सर्जनशील आहेत आणि त्यांना भौतिकशास्त्र आणि गणिताचे ज्ञान आहे ते सहजपणे हा कोर्स करू शकतात. हा कोर्स केल्यावर तुम्हाला दरमहा 30 ते 40 हजार रुपये पगाराच्या रूपात मिळू शकतात. हा कोर्स करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च होईल, असे समजून चालावे.
अभियांत्रिकी पदविका
अभियांत्रिकीबाबत विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. अभियंता बनण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी, चार वर्षांची बीटेक पदवी घेण्याऐवजी केवळ अभियांत्रिकीमध्ये पदविका मिळवून नोकरी मिळवू शकतात. अनेक संस्था आणि पॉलिटेक्निक महाविद्यालये अभियांत्रिकी पदविका उपलब्ध करतात. असे केल्यावर, तुम्हाला मध्यम पातळीवरील नोकर्या सहज मिळू शकतात. यात दरमहा किमान 25000 ते 30 हजार रुपयांची नोकरी मिळू शकेल. तीन वर्षाचा हा कोर्स करण्यासाठी एक ते चार लाख रुपये खर्च करावे लागतील.
पॅरा मेडिकल कोर्स
दहावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करियर बनवता येते. यात ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, एक्स रे टेक्नॉलॉजी, रेडियोग्राफी आणि मेडिकल इमेजिंग ईसीजी टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये डिप्लोमा कोर्स करता येतात. पॅरा मेडिकलमध्ये डिप्लोमा केल्यावर तुम्हाला लॅब तंत्रज्ञ किंवा सहाय्यक म्हणून नोकरी मिळेल. यातून आपण वार्षिक 2 लाख ते 5 लाख मिळवू शकता. हा कोर्स करण्यासाठी एक ते तीन लाख रुपये लागतील.
ललित कलामध्ये पदविका
सुरुवातीपासूनच अॅनिमेशन, डिझाइनिंग, प्रोग्रामिंग, ग्राफिक्स, व्हिज्युअलायझेशन या क्षेत्रांमध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ललित कला पदविका अभ्यासक्रम खूप उपयुक्त ठरणार आहे. दहावीनंतर ललित कला मध्ये 5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दरमहा 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हे करण्यासाठी 10000 ते 100000 पर्यंत पैसे लागू शकतात.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com