करिअरनामा ऑनलाईन । न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (DFSL Recruitment 2024) संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई
भरली जाणारी पदे – वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
परीक्षा फी – (DFSL Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.1000/-
2. मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.900/-
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा व कागदपत्र पडताळणी
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
वैज्ञानिक सहायक | 71 |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 30 |
वरिष्ठ लिपिक | 05 |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | 18 |
व्यवस्थापक | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक सहायक | विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण (DFSL Recruitment 2024) |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण |
वरिष्ठ लिपिक | विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science) परीक्षा उत्तीर्ण |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with Science) उत्तीर्ण. |
व्यवस्थापक | माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल. |
मिळणारे वेतन –|
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैज्ञानिक सहायक | एस-१३ (३५४००-११२४००) |
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस-८ (२५५००-८११००) |
वरिष्ठ लिपिक | एस-८ (२५५००-८११००) |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक | एस-७ (२१७००-६९१००) |
व्यवस्थापक | एस-10 (29200-92300) |
परीक्षा शुल्क विषयी – (DFSL Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
2. मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-
3. माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
4. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
5. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस. सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता).
2. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा.
3. वयाचा पुरावा.
4. सामाजिदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
7.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. (DFSL Recruitment 2024)
9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
14. एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा.
15. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु. घ. व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
16. लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र.
17. अनुभव प्रमाणपत्र.
18. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com