करिअरनामा ऑनलाईन । शेतकरी कुटुंबातील दीपक यादवराव चटप हा तरुण (Deepak Chatap Success Story) वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे जागतिक पातळीवर दिल्या जाणारी ‘चेव्हेनिंग’ नामक तब्बल 45 लाखांची शिष्टवृत्ती त्याला मिळाली आहे. वयाच्या 24 व्या वर्षी ही शिष्टवृत्ती मिळवणारा दीपक हा देशातील पहिला मुलगा आहे. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार ही शिष्यवृत्ती देत असते. लंडनच्या ‘सोएस’ नामक, या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली.
दिपकची कौटुंबिक पार्श्वभूमी (Deepak Chatap Success Story)
दीपक हा आदिवासीबहुल अशा लखमापूर (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. दीपक हा यादवराव व हेमलता चटप या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा आहे. तो ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. तो विदेशात उच्च शिक्षण घेणारा कुटूंबातील पहिला तरुण होय. त्याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले.तर पुणे येथील आयएलएस विधि महाविद्यालयातून त्याने कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली.
दुर्बल घटकांच्या प्रश्नांना फोडली वाचा
- सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याच्या माध्यमातुन वाचा फोडण्याचे विधायक काम दीपक करत आहे.
- शेतकरी नेते वामनराव चटप, पद्मश्री डॉ.अभय बंग, कायदेतज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत त्याने केलेले सामाजिक व विधिविषयक कार्य दखलपात्र ठरले आहे. (Deepak Chatap Success Story)
- त्याने शिक्षण घेताना मुंबईच्या अरबी समुद्रातील प्रदूषणाबाबतची याचिका हरित न्यायाधिकरणात दाखल केली.
- शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या.
- विधीमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले.
अश्याप्रकारे त्याने शेती व विधीविषयक चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
‘अखेर प्रदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न झाले पूर्ण’
परदेशात शिक्षणासाठी लागणारा खर्च अवाक्याबाहेर आहे; तरी देखील, शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे दीपकचे स्वप्न होते. तेव्हा दीपकची अडचण लक्षात घेता, लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्सला (Deepak Chatap Success Story) शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापिठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ.जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. तसेच, राजु केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी स्थानिक मित्रांची साथ आणि स्वत:च्या जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. परदेशातील त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ब्रिटीश सरकार उचलणार आहे.
अशी झाली जागतिक ओळख
- ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह त्याने वयाच्या 18 व्या वर्षी लिहीला. तर ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहीलेले पुस्तक चर्चेत राहीले.
- गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील, आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात त्याने वारंवार याचिका दाखल केल्या.
- “संविधानिक नैतिकता ” हा ऑनलाईन कोर्स (Deepak Chatap Success Story) तयार करून राज्यातील 1200 विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
- कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन 1300 कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरित केल्या. तर दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून त्यांना नवसंजीवनी दिली.
- कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी २०१८ ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्वाची भूमिका होती.
- कोरो इंडिया फेलोशिपच्या माध्यमातून तळागळात मूलभूत संविधानिक हक्कांवर कार्य केलं.
- समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नावर मोफत वकीली, शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग.
- शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली.
- शेतकरी आत्महत्येविषयी मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या. (Deepak Chatap Success Story)
- विधीमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले.
- शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com