करिअरनामा ऑनलाईन । प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (DBSKKV Ratnagiri Recruitment) आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृध्दी योजनेअंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ संशोधन विद्यार्थी, क्षेत्र सहाय्यक, कृषी चालक/मशीन ऑपरेटर, चालक, लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर, अन्न सुरक्षा दल सदस्य या पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे.
संस्था – कोंकण कृषी विद्यापीठ
भरली जाणारी पदे – (DBSKKV Ratnagiri Recruitment)
1. वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – 04 पदे
2. क्षेत्र सहाय्यक – 04 पदे
3. कृषी चालक/मशीन ऑपरेटर – 02 पदे
4. चालक – 02 पदे
5. लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर – 02 पदे
6. अन्न सुरक्षा दल सदस्य – 24 पदे
पद संख्या – 38 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2023
वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
2. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे (DBSKKV Ratnagiri Recruitment)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – M.Sc. (Agri.)/ B.Sc. (Ag.), MBA, and MS-CIT. Preference should be given to the experienced candidate
2. क्षेत्र सहाय्यक – B.Sc. (Agri.) or Diploma in Agriculture and MS-CIT. Preference should be given to the experienced candidate
3. कृषी चालक/मशीन ऑपरेटर – 1. इयत्ता ८ वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
इयत्ता ४ थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.
4. चालक – १. इयत्ता ८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
२. इयत्ता ४ थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा या विद्यापीठात सेवेत (DBSKKV Ratnagiri Recruitment) वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.
5. लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर – B.Com / B.Sc/B.A., Marathi, English Typing, MS-CIT. Preference should be given to the experienced candidate
6. अन्न सुरक्षा दल सदस्य – इयत्ता ४ थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.
मिळणारे वेतन –
1. वरिष्ठ संशोधन विद्यार्थी – Rs. 44,000/- दरमहा
2. क्षेत्र सहाय्यक – Rs.29,000/- दरमहा
3. कृषी चालक/मशीन ऑपरेटर – Rs.22,000/- दरमहा
4. चालक – Rs.22,000/- दरमहा
5. लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर- Rs.22,000/- दरमहा
6. अन्न सुरक्षा दल सदस्य – Rs. 300/- परीश्रमिक मानधन प्रति दिन
आवश्यक कागदपत्रे – (DBSKKV Ratnagiri Recruitment)
1. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना ‘अ’ मध्ये अर्जासोबत सादर करावे.
2. वयाचा लाभ/फायदा उमेदवाराकडून नॉनक्रिमीलेअर / जातीचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.
3. नावामध्ये बदल असल्यास गॅझेट (राजपत्र) जोडण्यात यावे.
4. जन्मतारखेचा पुरावा
5. प्रमाणपत्रे सत्यप्रतीत / स्वयंसाक्षांकीत असल्यास स्वयंघोषणापत्रासह जोडणे आवश्यक.
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
असा करा अर्ज –
1. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करायचा आहे.
3. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीला येताना उमेदवाराने आपल्या शैक्षणिक अर्हता, वय आणि जातीच्या प्रमाणपत्राची मुळ प्रती सोबत आणाव्यात. (DBSKKV Ratnagiri Recruitment)
3. मुळ प्रमाणपत्र असल्याशिवाय मुलाखत घेतली जाणार नाही.
4. मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
5. मुलाखतीसाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – dbskkv.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com