करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG 2023) साठी देशभरात 24 मदत केंद्रे स्थापन केल्याची घोषणा केली आहे. प्रवेश परीक्षेत उमेदवारांचा अधिक सहभाग निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे CUET UG परीक्षेसाठी अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी येत असतील तर ते जवळच्या NTA च्या मदत केंद्रांवर जाऊन मोफत अर्ज भरू शकतात. nta.ac.in आणि cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाईट्सवर मदत केंद्रांची माहिती उपलब्ध आहे.
मदत केंद्रांवर मिळणार मोफत सेवा
NTA ने जारी केलेल्या सूचनेनुसार, संपूर्ण भारतातील उमेदवारांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी CUET (UG) – 2023 परीक्षा मदत केंद्र उघडण्याचा (CUET UG 2023) निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यास मदत होईल. यामुळे, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल. उमेदवारांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत असेल, यासाठी कोणत्याही उमेदवाराकडून एक रुपयाही शुल्क आकरले जाणार नाही.
हे आहेत हेल्पलाइन क्रमांक
NTA च्या माहितीनुसार, CUET UG च्या इच्छुकांना कोणत्याही अडचणीविना परीक्षेसाठी अर्ज करता यावा आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे हा या सुविधेमागचा मुख्य हेतू आहे. यामुळे उमेदवारांना कोणत्याही सायबर कॅफेमध्ये तासनतास बसून राहण्याची गरज नाही. प्रत्येक मदत (CUET UG 2023) केंद्रात एक संबंधित गोष्टीतील अनुभवी व्यक्ती असेल जो उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यास मदत करेल. उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या जवळच्या मदत केंद्राला भेट देऊन फॉर्म भरू शकतात.
तसेच ज्या उमेदवारांना CUET UG 2023 साठी अर्ज करताना कोणत्याही (CUET UG 2023) समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते NTA हेल्पलाइन क्रमांक 011-40759000/011-69227700 वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] वर E-Mail करू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com