करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच (CTET Exam Date 2024) केंद्रीय पात्रता शिक्षक चाचणी म्हणजेच CTET जुलै 2024 साठी प्रवेशपत्र जारी करू शकते. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार सीबीएसईच्या (CBSE) अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार असून त्यापूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल.
सीटीईटी प्रवेशपत्रापूर्वी उमेदवारांना परीक्षेची (CTET Exam Date 2024) सिटी स्लिप दिली जाईल. CTET परीक्षा सिटी स्लिपमध्ये, उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जाते. परीक्षा केंद्राचे नाव, पेपरची वेळ आणि इतर तपशील CTET प्रवेशपत्रावर लिहिलेले आहेत. परीक्षेच्या दिवशी, उमेदवारांनी CTET प्रवेशपत्रासोबत वैध फोटो ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
असं डाउनलोड करा प्रवेशपत्र – (CTET Exam Date 2024)
पुढील स्टेप्स फॉलो करून CTET प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करा
1. CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
2. CTET Admit Card 2024 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
3. आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
4. तुमचे CTET प्रवेशपत्र 2024 स्क्रीनवर दिसेल.
5. CTET प्रवेशपत्र 2024 तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com