CTET Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षा ‘या’ तारखेला होणार; ऑनलाईन अर्ज सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CTET Exam 2024) मंडळातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ साठी ३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरुन ctet.nic.in. ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दि. २१ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे.

देशातील १३५ शहरांत 20 भाषांत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असणार आहेत. पेपर 1 हा पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी तर पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी असतो. ही परीक्षा MCQ पद्धतीने म्हणजेच बहुपर्यायी पद्धतीने घेतली जाते. यामध्ये प्रत्येक उत्तराला एक गुण मिळतो. प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. पात्र उमेदवारांना २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज
करण्याची मुदत आहे.
jagran josh

काही महत्वाच्या तारखा – (CTET Exam 2024)
1. अर्ज प्रक्रिया सुरु – 3 नोव्हेंबर 2023
2. अर्जाची अंतिम तारीख – 23 नोव्हेंबर 2023
3. परीक्षा फी भरण्याची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
4. परीक्षेची तारीख – 21 जानेवारी 2024

परीक्षेसंदर्भात काही महत्वाच्या लिंक्स –
1. फॉर्म भरण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
2. माहिती पुस्तिका – CLICK
3. परिपत्रक पाहण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
4. अधिकृत वेबसाईट – https://ctet.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com