करिअरनामा ऑनलाईन । CSIR UG NET 2023 परीक्षेचा निकाल (CSIR NET Result 2023) येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR NET) च्या डिसेंबर 2022 आणि जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.
National Testing Agency ने परीक्षेची तात्पुरती उत्तरे (Provisional Answer Key) 14 जून रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. तर या संबंधित हरकती दाखल करण्यासाठी उमेदवारांना 16 जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर 17 जून रोजी परीक्षेची अंतिम उत्तरे (Final Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे अंतिम उत्तरे प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेच्या निकालालाकडे लागले आहे.
इतके गुण आवश्यक
CSIR NET 2023 ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 33 टक्के गुण तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान 25 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
यंदा CSIR-UGC NET 2023 ची संयुक्त प्रवेश (CSIR NET Result 2023) परीक्षा भारतातील 178 शहरांमध्ये 6,7 आणि 8 जून रोजी देशभरात सुमारे 500 परीक्षा केंद्रांवर घेतली गेली होती. NTA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी सुमारे 2 लाख 74 हजार 27 अर्जदारांनी CSIR NET 2023 ची परीक्षा दिली होती. NTAने अद्याप निकालाची तारीख जाहीर न केल्यामुळे सगळेच निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
CSIR-UGC NET 2023 चा निकाल असा पहा – (CSIR NET Result 2023)
1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटवर CLICK करा – https://csirnet.nta.nic.in/
2. त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा वैयक्तिक (CSIR NET Result 2023) तपशील भरून सबमिट करा.
4. CSIR UGC NET 2023 चा निकाल समोर दिसेल.
5. निकाल डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट काढा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com