करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कंपनी सचिव (CS Exam 2024) संस्थेने ‘कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४’ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेने (ICSI) ऑनलाइन नोंदणीसाठी विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. मंगळवार (दि. 16) रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थी 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते 19 एप्रिल 2024 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत नोंदणी करू शकतील. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षांच्या नोंदणीसाठी आधी ९ एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतरही नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेने आणखी एक संधी दिली आहे.
विलंब शुल्क भरावे लागणार (CS Exam 2024)
या कालावधीत, विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना विलंब शुल्क देखील भरावे लागेल. तसेच आयसीएसने विद्यार्थ्यांना भरलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी देखील दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना (CS Exam 2024) त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दि. 20 एप्रिल रोजी दुरुस्ती विंडो सुरु करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, परीक्षा 2 ते 10 जून या कालावधीत घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com