करिअरनामा ऑनलाईन । सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स (CS Exam 2023) टेस्ट आता दि. ३० जुलै रोजी होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या दि. ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, यापूर्वी अर्ज करु न शकलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे, हे उमेदवार आता सोमवार दि. 10 पर्यंत अर्ज करु शकणार आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने त्यांच्या अधिसूचनेत म्हटले आहे की; शनिवारी दि. 8 जुलै रोजी होणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली (CS Exam 2023) आहे. रिमोट प्रोक्टोरिंग अंतर्गत ही चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सर्व पात्र उमेदवारांना परीक्षेच्या तीन दिवस आधी लॉग-इन क्रेडेन्शियल पाठवले जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com