CRPF Result 2024 : CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर; 9212 पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Result 2024) अंतर्गत कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन/पायनियर/मिन) पदाच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल PDF फॉरमॅटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये यशस्वी उमेदवारांचे तपशील दिले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा या पृष्ठावर दिलेल्या PDF च्या थेट लिंकवरून निकाल पाहू शकतात. यशस्वी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.

असा पहा निकाल –
1. सीआरपीएफ (CRPF) कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरतीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट rect.crpf.gov.in ला भेट द्या. (CRPF Result 2024)
2. यानंतर होम पेजवर निकालाशी संबंधित PDF ची लिंक दिसेल त्यावर क्लिककरून निकाल पहा.
निकालाच्या यादीत ज्या उमेदवारांची नावे नोंदवली जातील ते पुढील टप्प्यातील भरतीसाठी पात्र मानले जातील.

9212 रिक्त पदे भरली जाणार (CRPF Result 2024)
उमेदवारांशी संबंधित विविध तपशील निकाल पीडीएफमध्ये नोंदवले आहेत. यामध्ये उमेदवारांचा अर्ज क्रम क्रमांक, पोस्ट/ट्रेड, उमेदवाराचा रोल नंबर, उमेदवाराचे नाव आणि राज्य नोंदवले जाते. याभरतीद्वारे एकूण 9212 रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. यापैकी 9 हजार 105 रिक्त जागांवर पुरुष उमेदवारांची तर 107 रिक्त जागांवर महिला उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भरतीशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com