करिअरनामा । राज्यात वाढत्या कोरोना व्हायरसमुळे सर्व शाळा, लायब्ररी, मंदिरे, जिम, अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. व्हायरसच्या वाढत्या भीतीमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी लायब्ररीकडे पाठ फिरवली आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य लोकसेवा आयागाने याची दखल घेत आगामी परीक्षांबाबत महत्त्वाची सूचना केली आहे. आयोगाचे सचिव प्रदीपकुमार याबाबत म्हणाले की, “परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. तसेच परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. प्रश्नपत्रिकांचे देखील वितरण झाले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केली जाणार नाही. केवळ एक तासाचा हा पेपर आहे. मात्र, या परीक्षेला उपस्थित उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार नाही.”
.नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”