करिअरनामा ऑनलाईन ।ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खास वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या उमेदाराना आता या वेबसाईटवर आवश्यक पुस्तके मिळणार आहेत.
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार लॉकडाउनमुळे आपापल्या गावी केले आहेत.मात्र गावी राहून अभ्यास करण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध नाहीत.ग्रामीण भागातील गरज लक्षात महेश बडे आणि किरण निंभोरे या तरुणांनी पुढाकार घेऊन www.abcbook.in या वेबसाईटची निर्मिती केली आहे. MPSC,UPSC,बँकिंग,स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांना जिल्ह्याच्या – तालुक्याच्या ठिकाणी हवी असलेली पुस्तके उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे पुस्तके न मिळाल्यास उमेदवारांचा अभ्यास होत नाही,त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ही वेबसाईट निर्माण केली आहे. या वेबसाईटवर राज्यात कुठेही पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतील.सुरुवातीला पुस्तके पोहोचविण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.
अधिकृत वेबसाईट – http://www.abcbook.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com