करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत १ फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली विद्यापीठांनी तयार करावी. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून, ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
या दरम्यान कॉलेजे कशा पद्धतीने सुरू केली जावीत त्या संदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने विद्यापीठांनी घ्यावयाचा आहे. तसेच महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. तर केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असले तरी ५ मार्च नंतर १०० शंभर टक्के सुरू करण्याचा विचार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. जे विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये गावी गेले आहेत, घरापासून दूर आहेत, त्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना महाविद्यालयात येण्याची सक्ती महाविद्यालयांनी करू नये. विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन असे दोन्ही पर्याय खुले ठेवावेत, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com