करिअरनामा ऑनलाईन | कॉग्निझंट या कंपनीत प्रोग्रॅमर अॅनालिस्ट ट्रेनी (Cognizant Careers) या पदासाठी भरती होणार आहे. या पदभरतीसाठी वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदभरती शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी असेल. बीई, बीटेक, बीसीए, एमसीए, एमई, एमटेक झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारानं कामाबाबतचे प्रश्न, तक्रारी आणि स्पष्टीकरण लगेचच वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. नियोजित आणि अपेक्षित वेळेत टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामात सातत्य राखलं पाहिजे. सहकारी आणि वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. कामासंदर्भात सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे व (Cognizant Careers) आवश्यकतेनुसार त्यांचा क्रम लावला पाहिजे. एखादं काम मिळाल्यावर ते पार पाडण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. गरज असल्यास वेळोवेळी कामाबाबतचे अपडेट्स दिले पाहिजेत. वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक उमेदवारांना यासाठी संधी दिली जाणार आहे.
उमेदवारकडे हे स्किल्स असणे आवश्यक (Cognizant Careers)
या पदावर काम करणाऱ्यास इच्छुक उमेदवारांकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी एखाद्या प्रोजेक्टचा दर्जा टिकवण्यासाठी विविध ठिकाणांहून माहिती मिळवली पाहिजे. क्लायंटच्या मागण्या काय आहेत, तांत्रिक उपलब्धता काय आहे, याबाबतही ज्ञान घेतलं पाहिजे. त्याकरिता क्लायंटच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रं वाचली पाहिजेत. नॉलेज ट्रान्स्लेशन वर्कशॉपला हजेरी लावून तुमच्या प्रोजेक्टबाबत सर्व माहिती मिळवली पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तांत्रिक ज्ञान आणि तुमचं शिक्षण यात वेळोवेळी आवश्यक ती भर घातली पाहिजे.
अधिकृत वेबसाईट – cognizant.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com