शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेणार असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

आम्ही असे कधीच म्हटले नाही कि आम्ही परीक्षा घेणार नाही. जून महिन्यापेक्षा आज कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. जून महिन्यात परीक्षा घेतली नाही तर आपण आता परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात कसे टाकू शकतो. जूनमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला कि आत्ता आपण ज्या सेमिस्टर झाल्या आहेत त्यांचे अग्रिकेत मार्ग विद्यार्थ्यांना देऊन त्यांना पास करायचे. तसेच यानंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेणार असाही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना वाटते कि परीक्षा झाली तर माझे गुण वाढू शकतील असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचा मार्ग असेल असं ठाकरे यांनी नमूद केले.

दरम्यान, अमेरिकेत सरकारने शाळा सुरु केली आणि १ लाख विद्यार्थी कोरोना बाधित झाले. हे असे आपल्या इथे झाले तर काय करायचे? असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचारला. कोरोनाचे संकट गडद झालेले असताना परीक्षा घेऊन आपण विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही. मात्र नंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा सरकार विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की घेईल अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com